Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

इंचगाव येथे 'माझ्या घरासमोरून ट्रॅक्टर न्यायचे नाही', असे म्हणत एका तरुणाला काठीने बेदम मारहाण; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु

 इंचगाव येथे 'माझ्या घरासमोरून ट्रॅक्टर न्यायचे नाही', असे म्हणत एका तरुणाला काठीने बेदम मारहाण; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु


मोहोळ तालुक्यातील इंचगाव येथे 'माझ्या घरासमोरून ट्रॅक्टर न्यायचे नाही',असे म्हणत पांडुरंग मधुकर भोसले (वय २७,रा.इंचगाव,ता.मोहोळ) या तरुणाला आनंद भगवान चंदनशिवे याने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत पांडुरंग भोसले यांना डोक्यासह सर्वांगास मुकामार लागला. त्यांना कामती येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात आई संगीता भोसले यांनी उपचारासा



ठी दाखल केले. रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments