Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुरुल-मोहोळ रस्त्यावर ऊसतोड मजुराच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने जागीच ठार; कामती पोलीसात चालकावर गुन्हा दाखल


उसतोडणी करून गावात आलेल्या ऊसतोडणी मजुर बुधवारसिंह विश्राम सिंह (वय २२,रा.कारीछापर,ता,पोलमी,जि. कोरबा सिल्ली,राज्य छत्तीसगड) याच्या डोक्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला आहे.ही घटना मंगळवार,दि.३० जानेवारी रोजी रात्री कुरुल-मोहोळ रस्त्यावर कांबळे वस्तीजवळ घडली आहे.मृत बुधवारसिंह हा पायी चालत कुरुल ते मोहोळ रस्त्याने जात असताना कांबळे यांच्या वस्तीजवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर त्याचा क्र.एम.एच.२१/एएन २६३७) च्या चालकाने बुधवारसिंह यास समोरून जोराची धडक दिली.यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कामती बु.येथे दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून याची फिर्याद सुखी लाल राम (वय ४५,रा.सलखा,पो.बेलतरा.ता.जि.बिलासपूर,रा.छत्तीसगड) याने कामती पोलिस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार तांबोळी हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे



.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments