Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मोहोळ शहरातील माने वस्ती येथे विष प्राशन केलेल्या वृद्धाचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू; सिव्हिल पोलिसांची माहिती

मोहोळ शहरातील माने वस्ती येथे विष प्राशन केलेल्या वृद्धाचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू; सिव्हिल पोलिसांची माहिती


मोहोळ शहरातील माने वस्ती येथे अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचार सुरू असताना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. सदाशिव मुकिंदा माने (वय ७४, रा. माने वस्ती, मोहोळ) असे मयत वृद्धाचे नाव आहे. दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सदाशिव माने या वृध्दाने राहत्या घरात पिकावर फवारण्याचे औषध प्राशन केले होते. तदनंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मोहोळ व सोलापूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार करून पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दि. १६ मार्च रोजी मुलगा विठ्ठल माने याने बेशुद्धावस्थेत दाखल केले होते. त्यांचा उपचार सुरू असताना बुधवार, दि. २० मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती शुक्रवारी सिव्हिल पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...



Post a Comment

0 Comments