Advertisement

Breaking News
Loading...

होटगी येथे अज्ञात कारणावरून दोघांना सहा जणांकडून दगडाने जबर मारहाण; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू

 होटगी येथे अज्ञात कारणावरून दोघांना सहा जणांकडून दगडाने जबर मारहाण; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू




दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे दोघांना अज्ञात कारणावरून सहा जणांनी मिळून दगड आणि लाथाबुक्याने जबर मारहाण केली. ही मारहाण दि. 8 एप्रिल रोजी सायं. 7 वाजेच्या सुमारास झाली. शिवा अर्जुन काळे (वय 60), पायाल लालू काळे (वय 19), दोघेही रा. होटगी, ता. द. सोलापूर यांना राहत्या घराजवळ अज्ञात कारणावरून नागेश अर्जुन काळे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर 4 जणांनी मिळून दगड आणि लाथाबुक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत दोघांच्याही डोक्याला जखम आणि सर्वांगास मुका मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी 8 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात बहिण रुक्मिणीबाई चव्हाण यांनी दाखल केले. दोन्ही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments