Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुस्ती येथे वीज पडून 8 वर्षीय बालिकेचा अंत; सिव्हिल पोलीसांची माहिती


 मुस्ती येथे वीज पडून 8 वर्षीय बालिकेचा अंत; सिव्हिल पोलीसांची माहिती



जोरदार वादळ-सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला. त्यात शेतकऱ्यांच्या फळझाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसात वीज कोसळल्याने 8 वर्षीय लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झालाय. ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.


याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी ही, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती. शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड गर्दी केल्याने अगदी सायंकाळसारखा अंधार जाणवत होता. त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्ररूप धारण करून वाहू लागला होता. 


जोरदार वादळ वारे आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मुस्ती येथे वीज कोसळून लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीररीत्या जखमी झाली. तिला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफसीआय येथे तिच्या मात्यापित्यासह वास्तव्यास होती. तिच्या मावशीचे रविवार,दि. 21 एप्रिल रोजी लग्न असल्याने, आजोळी आली होती. ती त्यांच्या घराच्या गच्चीवर ४-५ मैत्रिणींसह खेळत होती. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments