Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात पतीने पत्नीसह प्रियकराचा कुर्‍हाडीने केला खून; मंद्रूप पोलीसात पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात पतीने पत्नीसह प्रियकराचा कुर्‍हाडीने केला खून; मंद्रूप पोलीसात पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल



दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावातील वस्तीवर बुधवारी, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेतात पत्नीसोबत तिच्या प्रियकराला पाहून संतापलेल्या पतीने वस्तीवरून कुऱ्हाड आणून दोघांवर हल्ला चढवला. यात पत्नी आणि तिचा प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन दोघांचाही तडफडून अंत झाला. या प्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात खून झालेल्या महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या तपासासाठी विविध ठिकाणी 7 पथके पाठवण्यात आल्याची माहिती मंद्रूप पोलिसांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रकरणी मृत तरुणाच्या वडीलांनी मंद्रूप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत मंद्रूप पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दक्षिण तालुक्यातील एका गावातील महिलेशी एका तरुणाचे अनैतिक संबंध होते. दोन्ही कुटुंबांनी दोघांनाही समजावून सांगितले होते. मात्र त्यांच्यात काही एक फरक पडला नाही. बुधवारी दुपारी वस्तीवरील द्राक्ष बागेत सदर महिला ही काम करत होती. त्यावेळी संबंधित प्रियकर हा तिथे आला. दोघांना शेतात एकत्र पाहून महिलेचा पती संतापला. त्याने जवळच असलेल्या वस्तीवर जाऊन कुऱ्हाड आणली आणि रागाच्या भरात पत्नी आणि प्रियकराच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जवळच वस्ती असल्याने प्रियकराचे वडील धावत घटनास्थळी आले. तेव्हा ते दोघेही गंभीर जखमी झाल्याने तडफडत होते. दोघांनाही तातडीने उपचारासाठी हलवण्याची त्यांनी विनंती केली. परंतू महिलेच्या कुटुंबातील उपस्थितांनी त्याला विरोध केला. यामुळे काही वेळातच दोघांचाही जागीच मृत्यू झाला.


संबंधित गावच्या हद्दीत दोघांचा खून झाल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या वस्तीसमोर दोघांचेही मृतदेह पडलेले दिसले. दोघांच्याही मानेवर व तोंडावर कुऱ्हाडीने गंभीर वार केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. यावेळी घटनास्थळावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूपच्या

ग्रामीण रुग्णालयात पाठवल्याची माहिती मंद्रूप पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट



Post a Comment

0 Comments