पोलीस अधिकारी लोबू चव्हाण यांची बदली करा अन्यथा आंदोलन करणार; जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांचा इशारा
मोहोळ तालुक्यातील पाटकुल आणि पेनुर बीटला पोलीस अधिकारी लोबू चव्हाण हे मागील सात ते आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे येथील पुढारी, सामान्य नागरिक तसेच अवैध धंदेवाईकांसोबत त्यांचे वैयक्तिक संबंध निर्माण झाल्याने या बिटच्या हद्दीत अवैध धंदे बोकळले आहेत. मागील सात ते आठ वर्षांपासून त्यांची अद्याप बदली करण्यात आली नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून पोलिस अधिकारी लोबू चव्हाण यांची तात्काळ बदली करा अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दि.12 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, जिल्हाधिकारी सोलापूर आणि मोहोळ तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…
बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक सागर कोळी
97636 21820
हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट
ल
0 Comments