Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुंभारी विडी घरकुल येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारु बाळगणार्‍या इसमावर वळसंग पोलीसात गुन्हा दाखल

 कुंभारी विडी घरकुल येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारु बाळगणार्‍या इसमावर वळसंग पोलीसात गुन्हा दाखल




दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विडी घरकुल येथे आरोपी महेश काशिनाथ बिराजदार (वय-29), रा. विनायक नगर, सोलापूर याने त्याच्या ताब्यात विना पास विना परवाना हातभट्टी दारू विक्री करण्याकरीता बाळगलेला अवस्थेत वळसंग पोलासांना मिळुन आला आहे. ही कारवाई दि. 16 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झाली. पोकॉ दिपक गाढवे यांनी वळसंग पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. त्याच्या ताब्यातील 3 हजार 200 रु. किंमतीची दोन पांढ-या प्लॉस्टीक कँन्ड मधील एकुण 32 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन नष्ट करण्यात आली आहे. त्याच्या विरुध्द महा. दारू बंदी कायदा कलमान्वये वळसंग पोलीसात दि. 16 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोना राठोड हे करीत अत्रल्याची माहिती वळसंग पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल


Post a Comment

0 Comments