कातेवाडी येथे 'माझ्यावर दाखल केलेल्या केसेस काढून घे' म्हणून पतीकडून पत्नीला जीवे मारण्याची धमकी; कामती पोलीसात गुन्हा दाखल
मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथे 'माझ्यावर दाखल केलेले केसेस काढून घे' म्हणून पतीने पत्नीला काठीने जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत स्वाती बालाजी गुन्नर, वय 35 वर्षे, रा. कातेवाडी ता. मोहोळ यांनी कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दि. 6 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास फिर्यादी शेतातील वस्तीसमोर बसले होते. फिर्यादीचा पती बालाजी विठोबा गुन्नर हा तेथे आला. 'तू गेले चार दिवसा खाली कोर्टात का गेली होती. तू माझ्यावर दाखल केलेले केसेस काढून घे' असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तेथेच पडलेल्या काठीने फिर्यादीच्या उजव्या हाताला, उजव्या पायाला व डोक्याला मारुन जखमी केले आहे. म्हणून सदर आरोपी विरुध्द कामती पोलीसात दि. 8 एप्राल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कामती पोलीस करीत असल्याची माहिती कामती पोलीसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.
ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…
बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक सागर कोळी
97636 21820
हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल
0 Comments