Advertisement

Breaking News
Loading...

नांदणीतील ‘महाराजा ऑर्केस्ट्रा बार’वर पोलिसांची धडक कारवाई — अश्लील नृत्य, कूपन उधळण, ₹ २६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त...

 


नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) :

गोपनीय माहितीनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बार वर दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी मोठी कारवाई केली. बारमध्ये महिलांकडून तोकडे कपडे घालून अश्लील हालचाली व प्रेक्षकांकडून नोटा-कूपन उधळण्याचे प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान स्टेजवर १५ महिला अश्लील नृत्य करताना, मोठ्या आवाजात संगीत, प्रेक्षकांकडून कूपनफेक तसेच हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेली कूपन्स आढळली.


बारमधून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

नोटांसदृश ८ बंडल

साउंड सिस्टम, अॅम्प्लिफायर, मिक्सर, फॅन, सोफा

१० चारचाकी वाहने (XUV, क्रेटा, इंडिगो, स्विफ्ट इ.)

३ मोटारसायकली, १ ऑटो

७ मोबाईल फोन (आयफोन, व्हिवो, मोटोरोला, रेडमी इ.)

एकूण जप्त मालाची किंमत ₹26,50,000/- एवढी आहे.

१५ महिलांना नोटीस देऊन पुढील तपासासाठी सोडण्यात आले.


सदर ठिकाणी दुर्गेश सनद, गोविंद गोस्वामी, हिरोकुमार गोस्वामी, लल्लन पंडीत यांसह अन्य आरोपी मिळून आले. तसेच तपासात बारचा मॅनेजर संजू उर्फ परसप्पा गायकवाड व मालक रोहित चव्हाण असल्याचे समोर आले.


गुन्हा नोंद:

मंद्रुप पोलीस ठाणे, गु.र.नं. 402/2025

भारतीय न्याय संहिता 2023 : कलम 296, कलम 3(5)

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2016 : कलम 3, 8(1), 8(2), 8(4)

महाराष्ट्र पोलिस कायदा : कलम 33(W)(R)


एकूण 21 आरोपी ओळखले गेले आहेत. फिर्याद — पोलीस अंमलदार गणेश पाटील, वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण. तपास सुरू आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले तसेच विशेष पथकाद्वारे करण्यात आली.

Post a Comment

0 Comments