मंद्रूप ( हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांडो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी, मंद्रूपच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत चार पदके पटकावली.
महिला गटात तनुजा नंदकुमार पवार हिने ५८ ते ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. तिची सोलापूर विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
याशिवाय, महिला गटातील प्रणाली उमण्णा व्हनमाने हिने ४६ ते ४९ किलो गटात कांस्यपदक, तर पुरुष गटात यश अमोगसिद्ध खंदारे याने ५४ किलो गटात कांस्यपदक मिळविले. पुरुष गटातीलच शिवराज सोमनिंग बोळकवठे याने ५८ ते ६३ किलोमध्ये रौप्यपदक पटकावले.
पंढरपूर येथील उमा महाविद्यालयात ही स्पर्धा पार पडली. सर्व पदकविजेत्या खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे, रेश्मा राठोड, दीपक धूळखेडे, सचिन कुंभार व सिध्दाराम विजापुरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Comments