Advertisement

Breaking News
Loading...

वडापूरमध्ये भीषण अपघात; रिपब्लिकन सेना जिल्हा प्रभारी यांच्या पत्नींसह मुलगी जखमी...

 


दक्षिण सोलापूर हॅलो रिपोर्टर प्रतिनिधी:- मौजे वडापूर, तालुका दक्षिण सोलापूर येथे 28 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या भीषण अपघातात रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धाराम उर्फ सिद्धार्थ कांबळे यांच्या पत्नी बायडा सिद्राम कांबळे यांच्यासह सोबत असलेली दीक्षा अरुण कांबळे ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.


घटनेची माहिती अशी की, बायडा कांबळे या शेतीच्या कामासाठी अंत्रोळी गावाकडे डाव्या बाजूने जात असताना समोरून विपरीत दिशेने (उजवीकडून डावीकडे येत) वेगाने (सुमारे 80–90 किमी) येणाऱ्या एमएच 13 बी 78 22 या क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. ही मोटरसायकल प्रेम मारुती गेजगे या तरुणाकडून चालवली जात होती.



धडकेत बायडा कांबळे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले असून, दीक्षा कांबळे हिच्या डाव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे.


अपघातानंतर दोघींनाही सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सिव्हिल रुग्णालयात रीतसर पोलीस केस नोंदविण्यात आली आहे. सध्या उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments