तांदुळवाडी ( हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी ): तांदुळवाडी परिसरातील सोलापूर–हैदराबाद रस्त्यालगत असलेल्या हॉटेल रिंकी बार व लॉज येथे हॉटेलच्या आड कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी धाड टाकून दोन जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये हॉटेल मालक अभिजित उर्फ सागर धानप्पा सोलापूरे (वय ३६) हा सत्ताधारी शिवसेना (शिंदे गटाचा) उपजिल्हा प्रमुख व माजी उपसरपंच आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखालील पथक — पीएसआय गायकवाड, पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपाली जाधव, पीसी बाळराजे घाडगे, दोरकर इत्यादींच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. बनावट ग्राहकास पाठवून सोलापूरे महिलांचे फोटो पाठवून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची पुष्टी करून पंचासमक्ष धाड टाकण्यात आली.
धाडीत सोलापूरे यासह संगीता मुक्तिराम जाधव (वय ५०) ही महिला ताब्यात घेण्यात आली. बनावट ग्राहकाकडून घेतलेले १५०० रुपये, स्मार्टफोन, निरोधचे पाकीट तसेच महिलांच्या अंगझडतीत मिळालेला मोबाईल जप्त करण्यात आला.
हॉटेलच्या खोल्या वेश्याव्यवसायासाठी वापरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन्ही आरोपींवर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत.
या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी असल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

0 Comments