Advertisement

Breaking News
Loading...

अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकणारच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास...

 


अक्कलकोट प्रतिनिधी: “लाडक्या बहिणी-भावांनी साथ दिली तर अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगर परिषदांवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल,” असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवसेनेतर्फे आयोजित विराट जनसभेत ते बोलत होते.

या वेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार रईसशेठ टीनवाला (अक्कलकोट) आणि प्रथमेश म्हेत्रे (दुधनी) यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.



३८२ कोटींच्या विकास आराखड्याची दीदाखोरी:

शिंदे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना अक्कलकोटसाठी ३८२ कोटींच्या व्यापक विकास आराखड्याला मंजुरी दिली होती. सध्या शहरातील ९ प्रमुख रस्त्यांचे काम सुरू आहे. वाहनतळ, वॉटर एटीएम, रस्ते विकास, सार्वजनिक शौचालये, हत्ती तलाव उद्यान सुधारणा, व्यापारी संकुल, भक्तनिवास, चौक सुशोभीकरण आदी प्रकल्प झपाट्याने पुढे जात आहेत.”

शहरासाठी ७२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेलाही मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गटार-ड्रेनेज, पथदिवे आणि स्वच्छता सुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची माहिती दिली.

अक्कलकोट तीर्थक्षेत्राला जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनी सज्ज करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“दुधनीमधील सर्व प्रलंबित विकासकामेही तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ,” असा शब्द त्यांनी दिला.



मोठ्या संख्येने उपस्थिती:

या सभेला माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, सोलापूर संपर्कप्रमुख महेशनाना साठे, शंकर म्हेत्रे, सोलापूर जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि अक्कलकोटकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*





Post a Comment

0 Comments