Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रुप शेख वस्तीमध्ये पशुसंवर्धन विभागाचा दुग्ध क्रांती अभियान उपक्रम उत्साहात संपन्न...

 


दक्षिण सोलापूर प्रतिनिधी: तालुक्यातील मंद्रुप येथील शेख वस्ती (उमर वस्ती) येथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित दुग्ध क्रांती अभियान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध गावांतील शेतकऱ्यांना पशुसंवर्धन, लसीकरण तसेच शासकीय योजनांचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


कार्यक्रमाला डॉ. प्रणाली क्षीरसागर (मंद्रुप पशुवैद्यकीय अधिकारी), डॉ. पांगे (निंबर्गी), डॉ. गिड्डे (हत्तूर) यांच्यासह लोकमंगल बँक कर्मचारी व भारतीय कृषी विमा कंपनीचे रामनाथ ढोबळे आणि धीरज कोळी उपस्थित होते.



या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच हेमंतकुमार स्वामी यांनी भूषवले. तसेच काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर कोरे, सुरेश मेंडगुदले उपस्थित होते.


यावेळी डॉ. पांगे यांनी पशुसंवर्धन, लसीकरण व आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. डॉ. प्रणाली क्षीरसागर यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. धीरज कोळी यांनी कृषी विमाबाबत शेतकऱ्यांना जागृती केली.


अध्यक्षीय भाषणात हेमंतकुमार स्वामी यांनी शेख कुटुंबाचे पशुसंवर्धनातील योगदान अधोरेखित केले. शेख कुटुंबातील उमर जाफर यांनी संवर्धन केलेल्या गाईला पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी गौरविल्याची आठवण त्यांनी करून दिली.


कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. त्यात अमीन शेख, सद्दाम शेख, अर्शद शेख, सोमनिंग कुमटाळे, उदय देशपांडे, आबा साठे, अविनाश साठे, बिरप्पा देवकते, मैनोद्दीन शेख, शब्बीर शेख, याकुब शेख, रमजान लिगेवान, दानेश शेख, शुकर शेख, पंडीत हेळवी, श्रीमंत हेळवी आदींचा समावेश होता.


या जनजागृती उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये पशुसंवर्धनाच्या आधुनिक उपाययोजना, लसीकरण व विमा संरक्षणाबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली.

Post a Comment

0 Comments