Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप येथील अंगणवाडी शाळेत घुसला नाग; सर्पमित्र अली मुजावर यांची तत्परता...

 


मंद्रूप (प्रतिनिधी) :- मंद्रूप येथील अंगणवाडी शाळेत आज सकाळी अचानक एक नाग शिरल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. शाळा सुरू होण्यापूर्वीच अंगणवाडी सेविकांना साप दिसल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तात्काळ मदत मागवली.



घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अली मुजावर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पूर्ण दक्षता घेऊन नागाला सुरक्षितरीत्या पकडले व त्याला जवळच्या जंगल परिसरात सोडून दिले. त्यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी टळली.



या प्रकारानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शेख यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “अंगणवाडी परिसरात नियमित स्वच्छता न होणे, गवताची दाट वाढ आणि मूलभूत सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे असे प्रकार घडत आहेत. मुलांच्या सुरक्षिततेकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.”




स्थानिक नागरिकांनीही अंगणवाडी परिसराची स्वच्छता व सुरक्षाव्यवस्था तात्काळ सुधारण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments