अनगर (हॅलो रिपोर्टर न्यूज मोहोळ प्रतिनिधी): अनगर नगराध्यक्ष निवडणुकीला मिळालेल्या स्थगितीनंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी पाटील परिवारावर जोरदार टीका केली. “प्रत्येकवेळी माझ्या उमेदवारीत अडथळे आणण्याचे काम पाटील परिवार करतो. आता किती वेळा जल्लोष साजरा करायचा आणि कितीवेळा फुगड्या घालायच्या हे त्यांनीच ठरवावं,” अशा शब्दांत थिटे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
निवडणुकीसाठी दाखल केलेला त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी कोर्टात दाद मागितली होती. निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय वर्तुळात नवे तणाव निर्माण झाले.
थिटे म्हणाल्या, “नियतीचे फासे फिरले आहेत. माझ्यावर कितीही राजकीय आडकाठी आली तरी मी मागे हटणार नाही. लोकांमध्ये असलेला विश्वासच माझी मोठी ताकद आहे.”
अचानक स्थगिती मिळाल्यानंतर अनगरमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

0 Comments