Advertisement

Breaking News
Loading...

निंबर्गी गणातून शैलजा सिद्धाराम जानकर इच्छुक; भाजपकडून संधी मिळाल्यास परिवर्तनाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा...



मंद्रूप / हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: निंबर्गी गणातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शैलजा सिद्धाराम जानकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या पती सिद्धाराम जानकर हे गेल्या अनेक वर्षांपासून निंबर्गी गणात प्रभावी जनसंपर्क असलेले, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेले आणि लोकांची अडलेली कामे तत्परतेने पूर्ण करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या सक्रिय कार्यशैलीमुळे परिसरात त्यांचा भक्कम जनाधार निर्माण झाला आहे.


शैलजा जानकर यांचाही जनतेशी थेट संवाद असून सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक व सहकार्याची राहिली आहे. सामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयांत अडकलेली कामे, महिला व युवकांचे प्रश्न तसेच स्थानिक पातळीवरील विकासाशी संबंधित विषयांमध्ये त्या सातत्याने पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे निंबर्गी गणातील अनेक मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.


भारतीय जनता पक्षाकडून निंबर्गी गणासाठी शैलजा जानकर यांना उमेदवारीची संधी मिळाल्यास त्या या संधीचे नक्कीच सोने करतील आणि भाजपचे संघटन अधिक बळकट करत विकासाभिमुख नेतृत्व देतील, अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व निंबर्गी गणाला मिळावे, अशी भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.



दरम्यान, निंबर्गी गणातील विकास, पायाभूत सुविधा, मूलभूत सोयी-सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून शैलजा जानकर यांच्याकडे पाहिले जात असून आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.






Post a Comment

0 Comments