Advertisement

Breaking News
Loading...

“सोशल मीडियावरून शेतकऱ्यांचा लढा पेटवणारे गुरव — शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त”

 


*दक्षिण सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:*  शेतकऱ्यांचे मनोगत आणि आंदोलनांचा आवाज सोशल मीडियावरून प्रभावीपणे पोहोचवणारे गिरमला धर्मण्णा गुरव (औज, ता. दक्षिण सोलापूर) यांची शेतकरी संघटना – सोशल मीडिया, सोलापूर जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

दि. ०१ डिसेंबर २००५ रोजी देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात त्यांच्या—

✔ सोशल मीडियावरील कर्तव्यनिष्ठ आणि प्रभावी कामगिरीची
✔ समाजकारणातील बांधिलकीची
✔ शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत असलेल्या संवेदनशील वृत्तीची
✔ आणि संघटनेसाठी असलेल्या समर्पणाची

दखल घेत ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.



संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजीराव नांदखिले तसेच राष्ट्रीय नेतृत्व मा. रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, “शेतीमालाला रास्त भाव” या एककलमी ध्येयासाठी सोशल मीडियावरून दमदार जनजागृती करण्याची जबाबदारी गुरव यांच्यावर देण्यात आली आहे.

संघटनेने छेडलेल्या विविध न्यायिक, राजकीय व सनदशीर आंदोलनांना अधिकाधिक प्रसिद्धी देण्याचे आवाहनही नियुक्तीपत्रातून करण्यात आले आहे.

गुरव यांच्या या निवडीबद्दल शेतकरी व समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments