भंडारकवठे| हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ. राजदत्त रासोलगीकर:भं
भंडारकवठे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासाचा झेंडा उंचावत सौ. कांचन राजू खडाखडे यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, भंडारकवठे परिसरात ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हाचा जोरदार गजर सुरू झाला आहे. “काम करत आलोय… काम करत राहणार…” या ठाम निर्धारासह राष्ट्रवादीने ही लढाई विकास विरुद्ध दुर्लक्ष अशी स्पष्ट केली आहे.
सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या, तळागाळातील प्रश्नांची जाण असलेल्या सौ. कांचन खडाखडे या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या असून, महिला, शेतकरी, युवक आणि कामगार वर्गाचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि रोजगार या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठोस आणि कृतीशील असल्याचा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद या उमेदवारीला लाभला असून, “दिलेला शब्द पूर्ण होतोच” या विश्वासावर मतदारांनी राष्ट्रवादीला संधी द्यावी, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
एक मत विकासाला… एक मत प्रगतीला…
आगामी शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या मतदानात ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून सौ. कांचन राजू खडाखडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
भंडारकवठे गटात राष्ट्रवादी काँग्रेसची हवा असून, विजयासाठी जनतेचा कौल आता ‘घड्याळा’च्या बाजूने झुकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

0 Comments