वडजी / दोड्डी | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वार्तांकन डॉ. राजदत्त रासोलगीकर...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार धनेश सुभाष अचलारे आणि कासेगाव पंचायत समिती गणतील काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांनी काल शनिवारी वडजी व दोड्डी या गावांमध्ये झंजावाती प्रचार दौरा केला. या दौऱ्याला गावातील नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रचार दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी स्वखर्चाने फटाक्यांची आतषबाजी करत धनेश अचलारे आणि अप्पा धनके यांचे जंगी स्वागत केले. गावोगावी झालेल्या होम-टू-होम भेटींमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. प्रचारावेळी निर्माण झालेली गर्दी पाहता परिसरात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे.
या प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. वडजी आणि दोड्डी गावांतील वातावरण पाहता विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, काही गावांमध्ये बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनेश अचलारे यांचे समर्थन दर्शवणारे स्टेटस ठेवणाऱ्या नागरिकांना विरोधकांकडून धमकी दिली जात असल्याच्या चर्चा समोर येत असून, त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
दोन्ही उमेदवारांना मिळणारा प्रचंड आणि वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांकडून समर्थकांना “त्यांच्यासोबत का फिरता” असे म्हणत दबाव व धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या प्रकारांमुळे मतदार अधिकच एकवटले असून, वडजी व दोड्डी गावांतील वातावरण पाहता बोरामणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनेश अचलारे आणि कासेगाव पंचायत समिती गणातील उमेदवार अप्पा धनके यांचा विजय आता अटळ आणि निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
या प्रचार दौऱ्यात युवक, ग्रामस्थ व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

0 Comments