कुंभारी | हॅलो रिपोर्टर | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
कुंभारी येथील श्री गेनसिद्ध प्रशालेत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दिनांक १४ ते २८ जानेवारी पर्यंत साजरा करण्यात आला. यात समीक्षण लेखन, विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या समीक्षणाचे अभिवाचन घेण्यात आले. काव्यवाचन, तबला पेटीच्या तालासुरात महाराष्ट्र राज्यगीत गायन, वक्तृत्व व मायबोली, मायभूमी मराठी वर आधारित विविध नृत्य घेण्यात आले. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या वेदांत चांगले या विद्यार्थ्याने अतिशय सुंदर तबला वादन सादर केले. २९ तारखेला सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, कथालेखन, निबंध लेखन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.
हे सर्व उपक्रम इयत्ता आठवी ते दहावी मराठी विषय शिक्षिका, मराठी विभाग प्रमुख श्रीमती बहिर्जे ए. टी. यांच्या मार्गदर्शनाने शाळेत संपन्न झाले. सदर कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश बसूदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विश्वेश्वर करकी यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे मुख्याध्यापक, संस्थाप्रमुख व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


0 Comments