मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वार्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “ताई-भाऊ, तुमचा विजय अटळ आहे” अशा घोषणा देत नागरिक भाजप उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत आहेत.
डोअर टू डोअर प्रचाराच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधताना भाजपच्या उमेदवारांना सर्वच घटकांतून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून प्रचारात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
मंद्रूप जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या उमेदवार सोनाली ताई कडते या यापूर्वी दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अनुभवसंपन्न, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्यशैलीचा सकारात्मक प्रभाव मतदारांवर पडत असल्याचे दिसून येत आहे.
तर पंचायत समिती गणातून मळसिद्ध मुगळे यांनी भाजपची उमेदवारी मिळवत राजकीय मैदानात दमदार एन्ट्री घेतली आहे. उच्चशिक्षित, नव्या विचारांचे आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे युवा मतदार, नवमतदार तसेच शेतकरी वर्गाचा कल मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे झुकताना दिसत आहे.
दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूप परिसरात राबविलेल्या विविध विकासकामांबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, त्या विकासकामांचा थेट लाभ भाजप उमेदवारांना होत असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
मंद्रूप गणातून मळसिद्ध मुगळेंची दमदार वाटचाल...
मंद्रूप गणातून भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांनी आमदार सुभाष देशमुख यांचा विरोध डावलून, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून मोठ्या आत्मविश्वासाने भाजपची उमेदवारी मिळवली आहे. अल्पावधीतच त्यांनी राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
२०१७ साली मंद्रूप ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. सामाजिक, राजकीय तसेच कृषी व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा जनतेशी थेट संपर्क असून, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनुभव, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आणि सर्वसामान्यांशी असलेला जवळचा संवाद ही त्यांची प्रमुख ताकद मानली जाते. तरुण, तडफदार आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून युवकांमध्ये त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.







0 Comments