Advertisement

Breaking News
Loading...

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा : खासदार प्राणिती शिंदे यांचे कंदलगावात आवाहन...

 


लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा : खासदार प्राणिती शिंदे यांचे कंदलगावात आवाहन...

कंदलगाव | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वार्तांकन डॉ. राजदत्त रासलगीकर:


लोकशाही टिकवायची आणि जिवंत ठेवायची असेल, तर आगामी निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन खासदार प्राणिती शिंदे यांनी केले. त्या कंदलगाव पंचायत समितीच्या उमेदवार शांताबाई व्हनमाने व मंद्रूप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सना कौसर शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होत्या.



कंदलगाव येथील ग्रामदैवत श्री केदारेश्वर देवस्थान परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजता ही प्रचारसभा पार पडली. यावेळी काँग्रेसचे नूतन नगरसेवक तथा शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके, उमेदवार शांताबाई व्हनमाने व सना कौसर शेख उपस्थित होत्या.



खासदार शिंदे पुढे म्हणाल्या की, “सामान्य जनतेचे प्रश्न, शेतकरी, महिला व युवकांचे हित जपणारी एकमेव चळवळ म्हणजे काँग्रेस आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सक्षम व प्रामाणिक नेतृत्व निवडून दिल्यास विकासाला गती मिळेल.” यावेळी त्यांनी भाजपच्या ध्येय धोरणावर सडकून टीका केली.


या सभेला काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments