मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर :
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रिति प्रभाकर कोरे व अप्पाराव गोपाळराव कोरे यांच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साही शुभारंभ झाला. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे आणि विकासाला गती देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मत उमेदवारांनी यावेळी व्यक्त केले.
मंद्रूप परिसरातील पाणीटंचाई, खराब रस्ते, आरोग्य सुविधांचा अभाव तसेच युवकांच्या रोजगाराशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन काम केले जाईल, अशी ठाम ग्वाही उमेदवारांनी दिली.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी गावभेटी, डोअर-टू-डोअर संपर्क व थेट मतदार संवादाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
आगामी काळात प्रचार अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबवण्यात येणार असून मंद्रूप गटात राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम जनसमर्थन मिळत असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
ग्रामदैवताच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास यावेळी दिसून आला.

0 Comments