🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!
प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर यांच्या शिरपेचात आणखीन एक पुरस्काराचा तुरा..
प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर यांना 'लोकमत एक्सलन्स अवॉर्ड प्रदान सोहळा दि.15 रोजी सोलापुरातील गुजराती भवन येथे होत आहे. त्यानिमित्त... रवी देवकर यांनी दिलेल्या शब्दशुभेच्छा..!
संघर्षातून उजळलेले दीप: अण्णासाहेब
आपल्या आयुष्यात अनेकदा असे काही क्षण येतात, जेव्हा सर्व आशा माळवतात, अंधार दाटून येतो; पण याच कसोटीच्या क्षणामध्ये काही माणसे एखाद्या दीपस्तंभासारखी उभी राहतात, जी केवळ स्वतःचे जीवन प्रकाशमान करीत नाहीत, तर इतरांनाही जगण्याची नवी उमेद देतात. असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर हे आहेत.
बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने आजतागायत सरांनी प्रदेशाध्यक्षपदावरून असंख्य अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य समजून अण्णासाहेबांनी स्वतःला त्या कार्यात वाहून घेतले. असंख्य अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता आणण्यात ते यशस्वी झालेले आहेत.अण्णासाहेबांनी उभे आयुष्य अन्याग्रस्तांची सेवा करीत आहे. त्यांचे आयुष्य हे विधायक कामांना प्रोत्साहन, सत्याचा पुरस्कार, भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि प्रसंगी उपोषण, मोर्चे, संघर्ष यासाठीच करीत आहेत. भारतीय संविधान तसेच शिक्षक संहिता याचे प्रचंड वाचन व अभ्यास असल्याने ते अन्यायग्रस्तांचे प्रश्न मांडताना पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल व्यक्ती म्हणून दिसून येतात. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आहे. 'एका हातात संविधान तर दुसऱ्या हातात पायताण' घेऊन फिरलेली डोकी ठिकाण्यावर आणण्याचे काम शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सर करीत आहे.
अण्णासाहेबांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला आश्चर्य वाटते. बहुजनक शिक्षक महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अन्यायग्रस्तांना न्याय देतात. बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या मानद सचिव पदावरून संपूर्ण पतसंस्थेचा अचूक कारभार पाहतात. कुटुंबप्रमुख म्हणून कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलतात. सद्संकल्प शिक्षण संस्थेच्या सचिव पदावरून गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देतात. साप्ताहिक 'बहुजन आवाज' या वृत्तपत्राचे संपादकपदाची धुरा उत्कृष्टपणे पार पाडत आहेत. याशिवाय युगप्रवर्तक, राष्ट्रनिर्माता, विद्यालंकार, युगपुरुष, विश्वरत्न यासारख्या ग्रंथांचे संपादकीय लेखन प्रकाशित आहे. सरांचे पत्रकार म्हणून विविध दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रात स्तंभलेखन तसेच प्रासंगिक लेख प्रकाशित झालेले आहेत. आजही त्यांचे लेखन सातत्याने सुरू आहे. त्यामुळेच त्यांच्या या पत्रकारिता क्षेत्रातील लेखन कार्याची प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन नवोदय पत्रकार निर्माण होत आहेत. त्यापैकी मी एक आहे.
बहुजन शिक्षक महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ असो अथवा नामदेवराव (बापू) बंडूजी भालशंकर गौरव समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ असो, यामध्ये अण्णासाहेबांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींची असंख्य गौरवपत्रे लिहिली आहेत. या गौरवपत्रातून सर्वसाधारण गेल्या पंधरा वर्षात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या रथी- महारथींच्या जीवनकार्याचा पट तसेच पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाचा पैलू निसटू न देता त्यांचे कार्य थोडक्यात शब्दांकित केलेले आहे. त्यामुळे या पुरस्काराला उच्च दर्जा आणि विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
'जिवात जिवमान असे तो जनसेवाच करू..!' या ध्येयाने प्रेरित होऊन अण्णासाहेब संस्थेच्या तसेच संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करीत आहेत. अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय, हक्क प्राप्त करून देणारी व त्यांच्यासाठी सतत कार्यरत असणारी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी संघटना ही फक्त सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर त्याचा विस्तार होत आहे. अशा अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली संघटनेमार्फत निरंतर विधायक कार्यक्रम राबवले जातात.
अण्णासाहेबांच्या या सामाजिक, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता, साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत आजतागायत विविध संस्था व संघटनेच्यावतीने 25 हून अधिक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केले आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिक लोकमत यांच्यावतीने 'लोकमत एक्सलन्स अवॉर्ड 2025- 26 हा पुरस्कार नुकताच अण्णासाहेबांना जाहीर झाला आहे. हा अण्णासाहेबांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्काराचा तुरा रोवला गेला आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ सोलापुरातील गुजराती भवन येथे शुक्रवार, दि. 15 मे रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. महापौर विनायक कोंड्याल, पोलीस उपायुक्त गौरह हसन, आयकॉन स्टीलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष तथा संचालक दिनेश राठी, लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे यांच्या हस्ते अण्णासाहेब भालशंकर यांचा सपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्यउपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, जिल्हा सहसचिव प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर, शहर महिला विभाग प्रमुख निर्मला मौळे, राज्यसंघटक अशोक पाचकुडवे आदींनी अभिनंदन केले आहे.
- रवी देवकर
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!


0 Comments