Advertisement

Breaking News
Loading...

जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत शिवानी विभूतेचे यश...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने 22 फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद हायस्कूल, शिंगडगाव या प्रशालेतील विद्यार्थिनी शिवानी मल्लिनाथ विभुते हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

 इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेली शिवानी हिने शिष्यवृत्ती परीक्षेत 178 गुण मिळवत जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवानीच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर अचलेरे तसेच इतर सर्व संचालक, संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक सुभाष भीमणवरू, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments