Advertisement

Breaking News
Loading...

“घरकुल वाळू प्रश्नावरून प्रांत अधिकाऱ्यांचा संताप; शिरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांना बैठकीतून हाकलले”

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दिनांक 14 मे 2026 रोजी पंचायत समिती स्तरावर आयोजित घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू वितरणासंदर्भातील बैठकीत तणावपूर्ण घटना घडली. या बैठकीत मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारत जाब विचारल्याने वाद निर्माण झाला.


बैठकीदरम्यान अनिल पाटील यांनी घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवठा का होत नाही, तसेच डिस्कळ परिसरातील नदीत सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. यासोबतच मोहोळ तालुक्यातील अवैध मुरूम उत्खननाबाबतही त्यांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले.



या प्रश्नांनंतर प्रांत अधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत अनिल पाटील यांना बैठकीतून बाहेर काढण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपस्थित अधिकाऱ्यांसमोर अरेरावीची भाषा वापरत त्यांना हाकलण्यात आल्याचेही सांगण्यात आले.


या घटनेनंतर अनिल पाटील यांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या वर्तनाचा जाहीर निषेध नोंदवला असून, दिनांक 13 मे 2026 रोजी त्यांनी मोहोळ तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन वाळू व मुरूम माफियावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास मंगळवारी पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील वाळू व मुरूम उपशाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापले असून, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments