Advertisement

Breaking News
Loading...

तेलगाव-खानापूर परिसरात वाळू माफियांचा सुळसुळाट; ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील रस्ते, पर्यावरण आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. तेलगाव-खानापूर परिसरात दिवस-रात्र वाळू वाहतूक सुरू असून, ओव्हरलोड ट्रक आणि डंपरमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून अपघातांचा धोका वाढला आहे. शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, सोलापूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक करणाऱ्या काही वाहनांचा व्हिडिओ स्थानिकांकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा असून, या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रभावी कारवाई होत नसल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अनेक सार्वजनिक रस्त्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर डंपर धावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले रस्ते काही महिन्यांतच खराब होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अवैध वाळू उपसा थांबवावा, ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करावी आणि खराब झालेल्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments