मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ |मंद्रूप हद्दीतील एका तरुणीचा गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण मारिआईवाले व सोनाबाई मारिआईवाले यांनी आपल्या समाजातील काही नागरिकांसह मंद्रूप पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत पोलिस प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, मुलगी बेपत्ता झाल्यापासून कुटुंबीयांनी वारंवार मंद्रूप पोलिसांकडे हेलपाटे घातले. मात्र, “मुलीचा शोध सुरू आहे, काळजी करू नका, ती सापडेल,” अशा प्रकारचे केवळ दिलासादायक शब्दच पोलिसांकडून मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रत्यक्षात अद्यापही मुलीचा शोध लागलेला नसून, तिला शोधून आणण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याची भावना कुटुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनामुळे काही काळ पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

0 Comments