Advertisement

Breaking News
Loading...

“वाढदिवस साजरा अनोख्या पद्धतीने; धनेश आचलारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोरामणीत भव्य रक्तदान शिबिर, ६५ जणांचा उत्स्फूर्त सहभाग..!”

 


बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे बोरामणी गटातील मा. पंचायत समिती सदस्य मा. धनेश आचलारे यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी एक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बोरामणी गावातील विठ्ठल मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ६५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. वाढदिवस साजरा करण्याची ही वेगळी आणि प्रेरणादायी पद्धत पाहून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव झाला.

यावेळी धनेश आचलारे मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. केक कापून, शाल, श्रीफळ, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन ब्लड सेंटरचे प्रमुख अमजद पठाण सर, सत्यम गायकवाड सर, पब्लिक रिलेशन ऑफिसर नंदिनी मस्के, विशाल कोलूर, टेक्निशियन मिसबा कोटी, लता श्रीमल, अभिषेक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.


कार्यक्रमाला धनेश आचलारे यांचे मित्र परिवार तसेच बोरामणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, अशा उपक्रमांची गरज आजच्या काळात अधिक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments