सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | अल्पवयीन मुलीवरील गंभीर अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पीडितेची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.
दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी संबंधित मुलगी घरात विश्रांती घेत असताना आरोपी लखन उर्फ बापू जोतीराम सावंत (रा. सिद्धार्थ नगर, माळशिरस) याने अनधिकृतपणे घरात प्रवेश करून तिच्यावर गैरकृत्य केले. याप्रकरणी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी करून आरोपीस अटक करण्यात आली. तसेच घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय तपासणी व साक्षीदारांचे जबाब घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
बार्शी येथील सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाने सादर केलेल्या साक्षी व पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला.
मा. न्यायालयाने आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली असून सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश दिले आहेत.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. दिनेश देशमुख यांनी बाजू मांडली. तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास व कोर्ट कामकाजात प्रभावी भूमिका बजावली.
ही माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

0 Comments