मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
भाषा व ललितकला विद्याशाखेतील मराठी विषयात कु. अक्षता अंबिगार हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत स्व. सरस्वती बंडगर व श्रीमती मंदाकिनी फडकुले या नावांची दोन सुवर्णपदके पटकावली.
तर कला व ललितकला विद्याशाखेतील इंग्रजी विषयात कु. सदफ शेख हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत कै. शिवकुमार कोनापुरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले. तसेच इतिहास विषयात राज जाधव याने विद्यापीठात तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी विभागाचे प्रा. डॉ. जवाहर मोरे, प्रा. विजय साळवे, प्रा. डॉ. लतिका कट्टिमनी, इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. सी. एस. मुलगे, प्रा. आर. एम. काळे, प्रा. डॉ. एस. बी. धनशेट्टी, तसेच इतिहास विभागाचे प्रा. डॉ. एन. डी. बनसोडे व प्रा. डॉ. एम. पी. कसबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी, उपाध्यक्ष ॲड. संदेश कोळी, उपाध्यक्ष डॉ. सी. जी. हविनाळे, सचिव एम. डी. कमळे, सहसचिव सुबोध कोळी, विश्वस्त नागेश बिराजदार तसेच प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


0 Comments