पुणे | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | पुणे विभागाचे नूतन शिक्षण उपसंचालक मा. मच्छिंद्रनाथ कदम साहेब यांचा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर आणि राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे, पुणे विभागीय संपर्कप्रमुख दाऊत आतार, प्रा. पुरुषोत्तम काटकर, प्रा. विकास काटकर, मोमीन सर यांच्यासह महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन शिक्षण उपसंचालक मा. मच्छिंद्रनाथ कदम यांना पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.



0 Comments