Advertisement

Breaking News
Loading...

शॉर्टसर्किटने आग लागून वृद्ध भाजून जखमी



दक्षिण सोलापूर तालुक्याती शिंगडगाव येथे आर्थिंगच्या वायरला पाणी टाकत असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन शर्टाला आग लागल्याने शंकर जंगलू पवार (वय वर्षे 60) हा वृद्ध भाजून जखमी झाला आहे.त्याच्या दोन्ही बगलांना इजा पोहचली.मंगळवार,दि.12 सप्टेबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.शंकर पवार हे शिंगडगाव येथील राहत्या घरी आर्थिंगच्या वायरला पाणी टाकत होते.अचानक करंट लागल्याने शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्या.यामुळे शंकर यांच्या शर्टाच्या दोन्ही बाह्यांनी पेट घेतला.पेटलेली आग हाताच्या वरपर्यंत जाऊन दोन्ही बगलांही भाजल्या.तातडीने वाहन करून भाजलेल्या अवस्थेत शंकर पवार यांना त्यांचा भाऊ नागू पवार यांनी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले.रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments