Advertisement

Breaking News
Loading...

नंदुर- डोणगाव येथील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हत्तूर येथील इसमाचा मृत्यू, सिव्हिल पोलीसांची माहिती

सोलापूर-विजयपुर बायपास महामार्गावरील नंदुर- डोणगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीवरुन जाणारे हत्तुर येथील रहिवासी तिप्पण्णा शरणप्पा तोळणुरे (वय वर्षे 65 ) या वृद्ध व्यक्तीस आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ते कामानिमित्त हत्तुरहून विजयपुर बायपास हायवेवरुन जात होते.या अपघाताची माहिती मिळताच सलगरवस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments