Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अंत्रोळी येथे वडिलांचा खून केल्याला मुलाला अखेर जामीन



दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे वडील शिवाजी बलभीम थोरात (वय वर्षे ५५,रा.अंत्रोळी,ता.दक्षिण सोलापूर) यांचा खून केल्याप्रकरणी मुलगा तानाजी थोरात यास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला.शिवाजी यांनी पत्नी महानंदा हिला कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले होते.त्याचा राग मनात धरून तानाजीने त्याच्या वडिलांमा झाडाला बांधून मारहाण केली होती.त्यात त्यांचा मृत्यू झाला.तसेच स्वतःचा बचाव करण्यासाठी दुचाकीवरून पडल्याने वडील मरण पावल्याची खबर दिली.पोलिसांनी तपास केला असता तानाजीने दिलेली खबर ही खोटी असून,तानाजी व त्याचा मामा भीमराव यांनीच शिवाजी यांमा काठीने ठार मारले असल्याची फिर्याद पीएसआय अमितकुमार करपे यांनी मंद्रुप ठाण्यात दिली होती.त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यावर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली.आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन जामीन मंजूर केला.आरोपीतर्फे अँड.रितेश थोबडे,तर सरकारतर्फे अँड.अनामिका मल्होत्रा यांनी काम पाहिले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....


Post a Comment

0 Comments