Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप- वडकबाळ रस्ता दुरुस्त करणे बाबत मंद्रूपच्या शेतकऱ्यांनी दिले अप्पर तहसीलदारांना निवेदन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप- वडकबाळ हा रस्ता 2017 पासून अर्धवट अवस्थेत असून यामुळे येथील शेतकऱ्यांना या रस्त्यावरून ये- जा करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.यासंबंधी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील अद्याप रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही.म्हणून मंद्रूप येथील शेतकऱ्यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी मंद्रूपच्या अप्पर तहसीलदारांना रस्ता दुरुस्त करणे बाबत निवेदन दिले.रस्ता दुरुस्त न झाल्यास २० सप्टेंबर पासून मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


यावेळी विजयकुमार जोडमोडे,अनमोल केवटे,अमोगसिद्ध जोडमोटे,अमजद मकानदार,रमेश जोडमोटे,अर्जुन राठोड,श्रीकांत खंदारे,मळसिध्द दोडमोटे,खंडू बनसोडे आदी शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments