Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचार




लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात घडला आहे.यातून पीडित मुलगी चार ते पाच महिन्यांची गरोदर राहिली आहे.याप्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात बलात्कार व पोस्को अंतर्गत अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत मंद्रूप पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,तालुक्यातील एका गावात ही अल्पवयीन मुलगी ऊसतोड कामगार असलेल्या आई-वडिलांसह राहत होती.गावातील शाळेत सातवी वर्गात शिकत होती.या मुलीच्या घराजवळ अल्पवयीन मुलगा राहत असल्याने त्यांची झाली.अल्पवयीन मुलगा पिडीत मुलीला मुलीला,'तू खूप सुंदर आहेस,मी तुझ्याशी लग्न

करतो,असे म्हणायचा.गेल्या वर्षी दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या मुलीस त्याने उसाच्या शेतात बोलावून अत्याचार केला.आई-वडील मारतील या भीतीपोटी हा प्रकार मुलीने घरात सांगितला नाही.त्यानंतर आठ-पंधरा दिवसाला अनेक वेळा या मुलाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.दि.10 सप्टेंबर रोजी पोटात दुखत असल्याने आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी वडिलांना निरोप दिला.एका खासगी डॉक्टरांकडे मुलीची तपासणी केली तेव्हा ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच आई,वडिलांना धक्काच बसला.वडिलांनी याबाबत मंद्रूप

पोलिस ठाण्यात धाव घेत मुलीवर झालेल्या अन्यायाची माहिती दिली.सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोलापूर बाल न्याय मंडळापुढे या मुलास हजर करण्यात आले.तर मुलीला

निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले हे करीत आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments