Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कारसह विहिरीत पडून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शिक्षकावर गुन्हा दाखल

भाटेवाडी येथे नवीन कार घेतल्याचे पेढे द्यायला सासरवाडीला गेलेले शिक्षक इरण्णा बसप्पा जुजगार(रा.मल्लिकार्जुन नगर,सोलापूर) यांचा १७ सप्टेंबरला ८० फूट खोल विहिरीत पडून मृत्यू झाला होता.या प्रकरणी स्वतःच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या इरण्णा जुजगार यांच्याविरूद्ध सलगर वस्ती पोलिसांत

पुन्हा दाखल झाला आहे.डोणगाव रोडवरील भाटेवाडी येथे १७ सप्टेंबर रोजी इरण्णा जुजगार हे पत्नी,मुलांसह नवीन कार त्याचा क्रमांक (एमएच १३, ईसी ६०६८) घेऊन सासरवाडीला गेले होते.त्यावेळी त्यांच्यासोबत चालक देखील होता.परंतू सासरवाडीत पोचल्यावर नवीन गाडी सावलीत लावण्यासाठी इरण्णा स्वतः कारमध्ये बसले आणि त्यांचे नियंत्रण सुटले.काही अंतरावरील विहिरीत त्याच वेगात इरण्णा कारसह कोसळले.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने इरण्णा यांचा मृत्यू

झाल्याची फिर्याद पोलिस हवालदार दीपक वाल्मीकी यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली.दिलेल्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल झाला असून पीएसआय सचिन मंद्रुपकर हे अधिक तपास करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments