Advertisement

Breaking News
Loading...

रिपब्लिकन कामगार सेनेचे मंगळवेढा,पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर


दिनांक १० सप्टेंबर २०२३ रविवार रोजी रिपब्लिकन कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार,रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष युवराज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन कामगार सेनेचे सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढा,पंढरपूर आणि सांगोला या तीन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवडीची बैठक मंगळवेढा येथील जिजामाता प्राथमिक शाळेत घेण्यात आली.



रिपब्लिकन कामगार सेने महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख अमित रामचंद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली.सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सागर कोळी व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संतोष अंकद यांनी बैठकीचे नियोजन केले होते.यावेळी रिपब्लिकन कामगार सेना जिल्हा संघटक पदी विष्णू बाबर,जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिल सावंत,जिल्हा सचिव पदी विजय बेंडे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.मंगळवेढ्याच्या तालुका अध्यक्ष पदी गोपाळ आयवळे,तालुका उपाध्यक्ष पदी नितीन साखरे,तालुका संघटक पदी वसंत मोची,पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी खंडू कोळी,तालुका महिला अध्यक्ष पदी शोभाताई मोटे,पंढरपूर शहर अध्यक्ष पदी कुमार बंदपट्टे,सांगोला तालुका अध्यक्ष पदी किरण कोळी,तालुका उपाध्यक्ष पदी भैरव रेड्डी यांची निवड करण्यात आली.


यावेळी मंगळवेढा,पंढरपूर,सांगोला तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते,


दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments