Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

थांबलेल्या मालट्रकमधून चोरट्याने 11 सिमेंटचे पोते नेले चोरुन

फिर्यादी रोहित भारत कांबळे,(वय 24)वर्ष,रा.कुमठे,ता.दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक ३ सप्टेबर 2023 रोजी दुपारी 01.30 वाजण्याच्या सुमारास होटगी गावातील बृहन्मठासमोर पारधी वस्ती जवळ आले मालट्रक त्याचा क्र.एम.एच.13 सी.यु.7244 तेथेच रस्त्याच्या कडेला थांबवून शौचास गेले होते.त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमाने मालट्रकमधून 4,180/- रूपये किंमतीचे चेट्टीनाड सिमेंट कंपनीचे एकूण 11 सिमेंटची पोती फिर्यादीच्या संमत्तीविना,स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मुददाम लबाडीने चोरून नेला आहे.तसेच ताडपत्री फाडून 2000/- रूपयांचे नुकसान केले आहे.म्हणून अज्ञात चोरट्या विरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अधिक तपास पोलीस काँन्स्टेबल मुल्ला हे करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments