Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुंभारी येथे रजा नाकारल्याने सहशिक्षकाची मुख्याध्यापकाला बेदम मारहाण

रजेचे कारण पुढे करत हुज्जत घालून अरेरावी,दमदाटी करण्याबरोबरच जीवे मारण्याची धमकी देत एका सहशिक्षकाने चक्क मुख्याध्यापकाला बेदाम मारहाण केली.यात मुख्याध्यापकाचे कान फाटले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील दादागिरी चव्हाट्यावर आली आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना महेश क्षीरसागर या सहशिक्षकाने मारहाण करून जखमी केले.जखमी मुख्याध्यापकावर सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींनी रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केले.याबद्दल अधिक माहिती अशी की कुंभारी परिसरात मराठी मुलांची शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा,जिल्हा परिषदेची मुलींची मराठी शाळा आहे.सुमारे 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मुलींच्या शाळेमध्ये महेश क्षीरसागर नावाचे सहशिक्षक कार्यरत आहेत.क्षीरसागर यांनी या मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र पाटील यांना रजा मागितली,परंतु आज शाळेत कार्यक्रम आहेत.रजा देता येणार नाही,असे सांगत मुख्याध्यापक पाटील यांनी त्यांना रजा नाकारली.याचा राग मनात धरून क्षीरसागर याने मुख्याध्यापक पाटील यांना लाकडी दांडा व लाथाबुक्याने मारहाण केली.हा सगळा प्रकार चालू असताना कुंभारीचे केंद्रप्रमुख कुंदा राजगुरू,कुंभारीचे सामाजिक कार्यकर्ते गजानन होनराव,राहुल वंजारी,पप्पू कुदरे,आप्पाशा चांगले यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि जखमी मुख्याध्यापक पाटील यांना पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्समधून सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.



दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments