Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अंत्रोळी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या रखडलेल्या घरकुलांचे भूमिपूजन संपन्न...

अंत्रोळी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या रखडलेल्या घरकुलांचे भूमिपूजन संपन्न...




दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील भूमिहीन बेघरांना घरकुल मंजूर होऊनही केवळ जागेअभावी बांधकाम करता येत नव्हते.यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने गायरान जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.त्यानुसार पहिल्या टप्प्यात 18 प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी मिळाली.अंतिम मंजुरीनंतर या घरकुलाचे बांधकाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2017- 18 पासून रखडलेली 18 लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन समारंभ सरपंच माया ब्रह्मदेव सलगरे व उपस्थित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या व लाभार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी प्रथमता प्रकल्प संचालक अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर डॉक्टर ठोंबरे,सहाय्यक प्रकल्प संचालक अधिकारी साळुंखे,दक्षिण सोलापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली व घरकुल लाभार्थ्यांना ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांच्यामार्फत मार्गदर्शनही करण्यात आले.


या कार्यक्रमास सरपंच माया सलगरे,ब्रम्हदेव सलगरे, डाॅ.आदिनाथ खरात,ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बंडगर,इन्नूस शेख,ग्रामसेवक फडतरे,प्रगतशील बागायतदार झांबरे-पाटील,रावसाहेब महिमकर,चंद्रकांत कोकरे,माजी उपसरपंच मजनोद्दीन पठाण,आनंदा कर्वे,अप्पासाहेब येवले,तानाजी कोळी,भगवंत करॆ,इरफान शेख,अल्लाउद्दीन शेख,ग्रामपंचायत सेवक नाथाजी केंगार,संजय कोळी,चांगदेव केंगार,चिदानंद परिक्षाळे,राजु कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील सर्व घरकुल लाभार्थी,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments