Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनगोळी येथे मागील भांडणाच्या रागातून दोघांना ६ जणांनी मिळून स्टीलच्या बकेटने केली मारहाण; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू

 मनगोळी येथे मागील भांडणाच्या रागातून दोघांना ६ जणांनी मिळून स्टीलच्या बकेटने केली मारहाण; सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू





दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर ओंकार रामजी पाटील (वय 21), प्रतिक कुबेर माने (वय 22), दोघेही रा. मनगोळी, ता. द. सोलापूर यांना मागील भांडणाच्या रागातून यादव शिवप्पा घंटे, शिवम यादव घंटे आणि इतर चार जणांनी मिळून काठीने आणि स्टीलच्या बकेटने बेदम मारहाण केली. ही मारण २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाली. या मारहाणीत दोघांनाही जबर मुकामार लागल्याने मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करवून दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी स्वतःहून दाखल झाले. दोन्ही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही माहिती वृत्त संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर चे संपादक सागर कोळी यांनी.

Post a Comment

0 Comments