Advertisement

Breaking News
Loading...

उळेवाडी येथे हिंदू स्मशानभुमी नसल्याने मयतावर रस्त्यावर करतात अंत्यसंस्कार, ग्रामस्थ संतप्त

  उळेवाडी येथे हिंदू स्मशानभुमी नसल्याने मयतावर रस्त्यावर करतात अंत्यसंस्कार, ग्रामस्थ संतप्त

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेवाडी येथे हिंदू स्मशानभुमी नसल्यामुळे मयतावर अंत्यसंस्कार हे चक्क रस्त्यावर करावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अनेक वर्षांपासून उळेवाडीकर ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे मारुनही हिंदू स्मशानभुमीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

यावेळेस माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरदार शेख, सामाजिक कार्यकर्ते विजय घायाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहिते यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरदार शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विजय घायाळ, ग्रामस्थ संतोष मोहिते आणि उळेवाडी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



.दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments