Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अकोले मंद्रूप येथे 25 15 अंतर्गत सुरू असलेल्या स्मशानभूमीचा रस्ता निकृष्ट दर्जाचा; ठेकेदाराने दिली उडवावडीची उत्तरे

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले- मंद्रूप या येथे पीडब्ल्युडीच्या अखत्यारितील २५ १५ योजनेअंतर्गत स्मशानभूमी रस्त्याचे काम शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुरु होते. सदरच्या रस्त्यावर वाढलेले गवत न काढता, पाणी न मारता रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू होते. यासंदर्भात कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर कोळी यांनी संबंधित ठेकेदार हेमंत पिंगळे यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर रस्ता हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने तो रस्ता लवकरच खराब होणार यात मात्र शंका नाही. सद





र सिमेंटचा रस्ता बनवताना वापरण्यात येणारे मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी ठेकेदाराकडून वापरण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याचे नाव काय यादीत टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी अकोले मंद्रूप येथील रहिवासी बंडोपंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments