Advertisement

Breaking News
Loading...

बोरामणी येथे गोरज मुर्हूतावर 10 जोडप्यांच्या बांधल्या गेल्या सप्तपदीच्या 'रेशीमगाठी'.....

 बोरामणी येथे गोरज मुर्हूतावर 10 जोडप्यांच्या बांधल्या गेल्या सप्तपदीच्या 'रेशीमगाठी'.....


पंचायत समिती सदस्य आचलारे मित्र मंडळाचा उपक्रम..........



सनई-चौघडयांच्या 'मंगल'सुरात, हजारो व-हाडीमंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे गुरूवारी

सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांच्या गोरज मुर्हूर्तावर एस.व्ही.सी.एस.प्रशालेच्या प्रागणांत दहा जोडप्यांच्या सप्तपदीच्या 'रेशीमगाठी' बांधण्यात आल्या. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नव वधू-वरांस शुभाशिर्वाद देऊन त्यांच्या भावी सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



बोरामणी येथे दरवर्षी माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांच्यावतीने सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयांचे आयोजन करण्यात येते. यंदा या सोहळयांचे बारावे वर्ष होते. सकाळी अकरा पासूनच नव वधू-वरांचे व पाहुणे मंडळीचे बोरामणीत आगमन होत होते.यावेळी आलेल्या व-हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनांची उत्तम व्यवस्था सकाळपासूनच करण्यात आली होती. यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मणी-मंगळसूत्रासह सौभाग्य अंलकार,शालू तसेच नवरदेवास सफारी सह दोन्ही वधू-वरांना हळदीचे कपडे व संसारपयोगी भांडी देण्यात आले. यावेळी वधू-वरांचे गावातून बग्गीतून सवाद्य मिरवणूक काढणयात आली. त्यानंतर सांयकाळी भव्य मोकळ्या मंडपाखाली,विद्युत रोषनाईच्या झगमगाटात तसेच विविध धार्मिक मंत्रोपचारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, युवा नेते सुदीप चाकोते, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवा नेत्या शीतल म्हेत्रे, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, अशोक देवकते,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख प्रिया बसवंती, सरपंच नागनाथ गायकवाड, नागराज पाटील, विजय राठोड, दशरथ कसबे, राजन जाधव, नागेश गायकवाड , बाळासाहेब वाघमारे, श्रीदेवी फुलारी आदी उपस्थित होते.


या विवाह सोहळयांचे संयोजक धनेश आचलारे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करून या जोडप्यांना पहिली मुलगी झाल्यास आचलारे मित्र परिवारांकडून मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या नावाने

अकरा हजार ठेव ठेवण्यात येईल असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंगेश लामखाने यांनी केले तर आभार अप्पासाहेब हलसगे यांनी मानले. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी धनेश आचलारे

मित्र परिवारासह गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments