Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

औंढी येथील दोन शेतकऱ्यांची दोन द्राक्ष व्यापाऱ्यांनी सुमारे ₹ 21 लाखांची केली फसवणूक; मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

 औंढी येथील दोन शेतकऱ्यांची दोन द्राक्ष व्यापाऱ्यांनी सुमारे ₹ 21 लाखांची केली फसवणूक; मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल


द्राक्ष बागेतील द्राक्ष सुमारे २१ लाखात ठरवून ठरलेली रक्कम देता दोन शेतकऱ्यांची दोन द्राक्ष व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील औंढी गावात घडली आहे. यासंदर्भात विवेक शंकर माने (वय 31), रा. औढी ता.मोहोळ यांनी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 19 मार्च 2023 रोजी शिवाजी अर्जुन सलगर रा.सनमडी ता. जत जि. सांगली व संतोष चौगुले रा. मंगेवाडी, ता. सांगोला हे द्राक्षाचे व्यापारी असून त्यांनी फिर्यादीची शेतात असेलेली दोन एकर द्राक्ष बागेतील 6,53,750 /- रु किंमतीची 26 टण 150 किलो वजनाची द्राक्षे त्यांनी त्याच्या अशोक लेलँण्ड टेम्पो क्र. एम. एच. 45 ए. एफ. 6208, आयशर टेम्पो क्र.एम.एच.45 ए.इ.5158 व इतर एक टेंम्पो असे तीन टॅम्पो मधुन सदर द्राक्षेचे पैसे 5 दिवसांनी देतो, असे सांगून घेवून गेले. तसेच फिर्यादीचे मित्र अंकुश अज्ञान गावडे रा. पाटकुल ता. मोहोळ यांची 14,70,548 /- किंमतीची द्राक्षे घेवून गेले. परंतू दोघांचेही आजतागायत पैसे दिले नाहीत. फिर्यादीची व फिर्यादीच्या मित्राची अशी एकूण 21,24,298/- रुपयांंची दोघांनी अर्थिक फसवणुक केली आहे. म्हणून दोन्ही आरोपींवर मोहोळ पोलीसात दि. 8 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि ओलकर हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…


बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट




Post a Comment

0 Comments