Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

निंबर्गी येथे किराणा आणि मेडिकल दुकान फोडून ₹ 63 हजार रोख रकमेची अज्ञात चोरट्यांकडून चोरी; मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल

 निंबर्गी येथे किराणा आणि मेडिकल दुकान फोडून ₹ 63 हजार रोख रकमेची अज्ञात चोरट्यांकडून चोरी; मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल


दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे अज्ञात चोरट्याने दोन किरणा दुकाने आणि एक मेडिकल दुकान फोडून एकुञ 63 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. निंबर्गी येथील प्रवीण किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून गल्ल्यातील 62 हजार रुपये चोरले आहेत.

तसेच याच गावातील वसंतकुमार पवार यांचे किराणा दुकान फोडून एक हजार रुपये चोरले आहेत. इब्राहिम पटेल यांचे मेडिकल दुकान देखील चोरट्याने फोडले. ही घटना दि. 12 एप्रिल 2024 रोजी रात्री 9 वाजल्यापासून ते दि. 13 एप्रिल 2024 रोजीच्या पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पीएसआय अमितकुमार करपे, पोलीस हवालदार किरण चव्हाण आणि पोलीस हवालदार शहानूर मुलाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळांची पाहणी केली. यावेळी श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. परंतू ते परिसरातच घुटमळले. या घटनैची फिर्याद सिद्धाराम बोरगी यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शहानूर मुलाणी हे करीत असल्याची माहिती मंद्रूप पोलिसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट





Post a Comment

0 Comments